STORYMIRROR

Kshitija Bapat

Romance

3  

Kshitija Bapat

Romance

कुणीतरी मनी

कुणीतरी मनी

1 min
199

कुणीतरी कसे काय

घर करून ते जाते 

कसे कुणास ठाऊक

काय असे मनी नाते


कधी कधी कुणीतरी

जातो सुकून देऊन

किती वेळ ते बघावे

मन कसेे उकलून 


कुणी देऊन जाते ह्या 

हसू गोड चेहऱ्यावर

बघताच क्षणी त्याला

जीव जडतो त्याच्यावर


राज्य करत कुणी ते

हळव्या या मनावर

मन पळते त्याकडे

जसे होऊन पाखरू


वेड्या मनाला राजसा

कसे अंतरी आवरू

मन माझे गुंतले

कसे मनाला सावरू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance