प्रेम...
प्रेम...
प्रेम...
प्रेम ...
एक सुंदर शब्द
ज्याचा अर्थही सुंदर.
प्रेम ...
एक पवित्र बंधन
पतीपत्नीच्या नात्याचं.
प्रेम ...
एक भक्कम आधार
यशस्वी जीवनाचा.
प्रेम ...
एक मधाचं पोळं
जेथे सारे भिरभिरती.
प्रेम ...
एक अथांग सागर
जेथे दुःख बुडतात.
प्रेम ...
एक असा मार्ग
एक दुसऱ्याला समजण्याचा.
प्रेम ...
एक दृढ विश्वास
पुढच्यास जिंकण्याचा.

