परिचारिका
परिचारिका
1 min
174
धर्म वर्ण जाती पाती
विसरुन भेदभाव
परिचारिका करते
मनोभावे रूग्णसेवा
आजारांची काळजी
घेते ती रात्र दिवस
देते ते औषध पाणी
नाही करत आळस
परिचारिका म्हणजे
डॉक्टरचा उजवा हात
अनुभवाने शिकून
रुग्णांना सांभाळतात
स्वतःच्या जीवाची त्यांना
नाही परवा रुग्णांची
सेवा करणे वैद्याचा
चिकित्सावर निष्ठा त्यांची
कोरोना काळातही त्या
देवदूत या ठरल्या
केली जिवा भावे सेवा
दिली त्यांनी महामारी ला
टक्कर नाही हटल्या
मागे काहींचे जीवही
गेले तरी केली सर्व
परिचारिकांनी रुग्णसेवा
