STORYMIRROR

Kshitija Bapat

Comedy

3  

Kshitija Bapat

Comedy

तक्रार

तक्रार

1 min
222

तुझ्याशी झाले लग्न

संसारात झाले मग्न

स्वप्न किती पाहिले

झाले सर्व भग्न


नाही आहेस तू

थोडासाही रोमँटिक

तरीही माझ्यासाठी

तूच आहे पीस अँटिक


नाही दाखवला मला

तुम्ही मुंबईचा टावर

मग बाथरूम मध्ये

बसवा ना एक शावर


नाही घेऊन दिली

मला कधी येवला पैठणी

मग बनवा ना तुझ्या

हृदयाची राणी


घेऊन दिला नाही

कधी डायमंड हार

घरासमोर ठेवतो

कुंकू लावून उभी कार


समाजसेवेसाठी

नेहमीच असतो तत्पर

बनवून दिला नाही

कधी चहा कपभर


माझ्या आता काहीच

नाही राहिल्या तक्रार

सर्व गोष्टीला

देतो तू का नकार


बायको म्हणजे

गृहलक्ष्मी कर स्वीकार

तेव्हाच होईल

संसार तुझा साकार



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy