STORYMIRROR

कवी : गणेश पवार

Inspirational

3  

कवी : गणेश पवार

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
11.8K

काढू रांगोळी अंगणी

लावू पताका तोरणे

गोड पदार्थ खाऊन

गाऊ मराठी भजने...


आज दिवस भाग्याचा

देऊ संस्कृतीला मान

एकमेकांच्या सौख्याचा

करू साजरा छान...


झेंडा अटकेपार फडके

शिवछत्रपतींचे मावळे

आम्ही महाराष्ट्राचे लाडके

भय न आम्हाला कोठले...


बाणा आमुचा मराठी

थाप शाबासकीची पाठी

जीव आमुचा या मातीसाठी

जन्म मराठी जपण्यासाठी...


दऱ्या खोऱ्यानी भरले

गर्जा महाराष्ट्र माझा

गड किल्ल्यानी सजले

जय महाराष्ट्र माझा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational