पुस्तक
पुस्तक
1 min
11.7K
बघा वाचून पुस्तके
पाने चाळून बघावी
आला कंटाळा सोडून
चित्रे रंगीत पहावी
ज्ञान वाढते वाचून
कधी कल्पना सुचते
कोणी सांगत नसून
दोन पुस्तके सांगते
मेंदू तल्लख बनून
स्वतः हुशार करते
ज्ञान दिल्याने वाढून
मान ज्ञानाने मिळते
रात्री सकाळी दुपारी
वेळ काढून वाचावी
सांगे ज्ञानाची शिदोरी
मैत्री सोबत वाटावी
शत्रू जवळ असला
पण ज्ञानाने पळवा
भीती कोणाला कसली
त्याला मानाने बोलवा
