जर---- तर
जर---- तर


रात्र मोठी वाटते
तर दिवस कंटाळवाणा
सोनेरी किरण आशावादी
तर चंदेरी स्वप्नाळू
प्रेम चकाकणारे मृगजळ
तर द्वेष लकाकणारी आग
मन अविचारी सूर्योदय
तर बुद्धी विचारी सूर्यास्त
तारुण्य बेचैन वरदान
तर वृद्धत्व स्वस्थ शाप
जीवन मंजुळ पण बधीर अंगाई
तर मरण कर्कश्य मूक किंचाळी