खेळ
खेळ




कपाळावरच्या रेखांमध्ये लपलास तरी
वहीच्या पानांमध्ये सापडलासच
भावनांच्या लागोपाठीची गंमत अशी की
विचारांनीही नेमकं तुलाच पकडलं
वर्तमान-भविष्याच्या आंधळ्या कोशिंबिरीत
भविष्याचा वेध घेता घेता,
तू भूतकाळातच लोप पावलास हे मात्र
वर्तमानात डोळ्यांवरची पट्टी काढल्यावरच कळलं
शेवटी काय तर
स्वप्नांचा लागोपाठ, प्रेमाचा लपंडाव आणि
नात्यांची आंधळी कोशिंबीर
हाच आयुष्याचा खेळ
हे मात्र नकळतरीत्या शिकवून गेलास