STORYMIRROR

मानसी मिठारी

Others

3  

मानसी मिठारी

Others

सांगायच आहे खूप काही

सांगायच आहे खूप काही

1 min
11.7K

सांगायचं आहे खूप काही

पण शब्द मात्र मिळत नाहीत

ऐनवेळी भावनांना माझ्या

पाझर काही फुटत नाही.


सांगायचं आहे खूप काही

पण शब्द मात्र मिळत नाहीत

कधी समंजसपणा नडतो

तर कधी अहंकार गुरगुरतो.


सांगायचं आहे खूप काही

पण शब्द मात्र मिळत नाहीत

कधी गैरसमजांची भेट होते

तर कधी वेळेची चुकामूक.


सांगायचं आहे खूप काही

पण शब्द मात्र मिळत नाहीत

कधी भीती वाटते तू न ऐकण्याची

तर कधी खात्री वाटते 

काहीच न बोलता तुला 

सगळंच कळण्याची.


Rate this content
Log in