STORYMIRROR

मानसी मिठारी

Romance

3  

मानसी मिठारी

Romance

भेट

भेट

1 min
37

अशी ती एक भेट

मज भुलवून गेली

प्रीत फुलवून गेली

अशी ती एक भेट


अकल्पित दरवाजा माझ्या मनीचा

अलगद उघडून गेली

अशी ती एक भेट


नकळत माझ्या हृदयावर

ते अडीच अक्षर कोरुन गेली

अशी ती एक भेट


नजरेच्या भाषेची व्याख्या

अगदी सहज शिकवून गेली

अशी ती एक भेट


अबोल स्पर्शाचे गुपित

शहाऱ्याद्वारे उलगडून गेली

अशी ती एक भेट


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance