सरीवर सरी
सरीवर सरी


या पावसाच्या चिंब सरी
वाऱ्याच्या झुळुकीपरी
कोरून जाती तुझा गंध मनावरी
विस्तीर्ण नभाखाली
जेव्हा धरती घेऊ लागते उभारी
तुझी न् माझी प्रीत घेते उंच भरारी
स्वप्न भासते सत्यापरी
सरीवर सरी
जणू स्वर्गाची दोरी
सय प्रियाची दाटते उरी
झाकोळून जाई हृदय हे निळ्याशार नभापरी
नकळत प्रीतलहरी येती मनाच्या सागरी
व्याकुळ हे मन भारी
वाटे मज धरावे तू आपुल्या करी
आणि फुलवावे दवबिंदू माझ्या ओठांवरी
क्षणाच्याही विलंबापरी