STORYMIRROR

मानसी मिठारी

Others

4  

मानसी मिठारी

Others

सांगायचं आहे खूप काही

सांगायचं आहे खूप काही

1 min
53


सांगायचं आहे खूप काही

पण शब्द मात्र मिळत नाहीत

ऐनवेळी भावनांना माझ्या

पाझर काही फुटत नाही


सांगायचं आहे खूप काही

पण शब्द मात्र मिळत नाहीत

कधी समंजसपणा पडतो

तर कधी अहंकार गुरगुरतो. 


सांगायचं आहे खूप काही

पण शब्द मात्र मिळत नाहीत

कधी गैरसमजांची भेट होते

तर कधी वेळेची चूकामूक


सांगायचं आहे खूप काही

पण शब्द मात्र मिळत नाहीत

कधी भीती वाटते तू न ऐकण्याची

तर कधी खात्री, 

काहीच न बोलता तुला सगळंच कळण्याची


सांगायचं आहे खूप काही

पण शब्द मात्र मिळत नाहीत


Rate this content
Log in