STORYMIRROR

मानसी मिठारी

Tragedy

3  

मानसी मिठारी

Tragedy

सांग ना!

सांग ना!

1 min
70

तुला माझी हाक कधी ऐकूच नाही आली

की ऐकूनही न ऐकल्याचं सोंग आणलंस?

सांग ना....


माझ्या डोळ्यात ती ओढ कधी दिसलीच नाही?

की पाहूनही आंधळा झालास? 

सांग ना....


त्या दिवशी आवाजातली कातरता जाणवतच नव्हती,

की जाणवूनही दुर्लक्ष केलंस?

सांग ना....


माझ्या भावना तुला कधी कळल्याच नाहीत,

की कळूनही वळू दिल्या नाहीस?

सांग ना....


सांग ना,

तुला सावरायला कमी पडले की,

बावरलेल्या मला आवरायला?

कुठे कमी पडले!

सांग ना....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy