मानसी मिठारी

Romance

4  

मानसी मिठारी

Romance

आज क्षणभर थांबावस वाटलं.

आज क्षणभर थांबावस वाटलं.

1 min
126


आज क्षणभर थांबावंस वाटलं, 

मागे वळून थोडं पाहावस वाटलं.

थोडं स्वतःलाच न्याहाळाव वाटलं, 

आज क्षणभर थोडं थांबवास असं वाटलं.


वाटलं,

तुला भेटल्यानंतर, 

"Still, we are just mates;

not on dates. Okay?"

असं सांगणारी ती मीच होते का?


हं, आपण अगदी दिवस - रात्र गप्पा मारतो,

आपले विचार जुळतात वगैरे सगळं ठीक आहे;

पण...... 

आयुष्याच्या गाठी जुळायला अजून वेळ आहे.

हे सतत बाजवणारी ती मीच होते का?

थोडं चाचपून पाहावं वाटलं, 

आज क्षणभर थोडं थांबवास वाटलं.


तुझ्यासोबत जगलेल्या क्षणांना , 

वेळेचं घड्याळ का कधी बांधता नाही आलं? 

ह्याचं थोडं गणित मांडावस वाटलं , 

आज क्षणभर थोडं थांबवास वाटलं.


तुला आज अंगठी घालताना, 

आपली ही वीण घट्ट करताना

जेव्हा उमगलं, 

मधल्या काळात स्पर्शानं मिळालेले अर्थ,

नात्यांना मिळालेली गोडी, 

आणि मला आत्तापर्यंत पडलेली,

सहज सुटत असणारी कोडी

हे सारं तुझ्याशिवाय व्यर्थ! 

तेव्हा मात्र ह्या क्षणांना थांबवावस वाटलं. 


निसटत्या नात्यांची आणि

मिळणाऱ्या गोत्यांची, 

घट्ट वीण गुंफावीशी वाटली

आज क्षणभर थांबावस वाटलं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance