शीर्षक प्राणी सभा
शीर्षक प्राणी सभा


जंगलातल्या प्राण्यांची
भरली एकदा सभा
सांगत ,"ऐका जरा...."
हत्ती राहिला उभा. (1)
मानवजातीला आपण
सहकार्य करतो पशू
मालवाहू म्हणून करिती
उपयोग नरपशू
खायला देती आम्हांला
अननसातून फटाके
हत्त्या करती गर्भिणीची
करती घोर पातके (2)
सर्कसमधे पाळती
कसरती करुन घेती
पैसा दाबून कमावती
तुकडा आपल्यापुढती " (3)
सिंह म्हणाला , " थांबा
क्रूर नाहीत सगळेच
काही आहेत कनवाळू
उपायही करती वेळेत (4)
प्राण्यांचे डॉक्टर आहेत
आपल्याला देवासारखे
पशूहत्त्या हे आता
आहे गुन्ह्यासारखे " (5)
शांत झाले हत्तीदादा
सारे हसू लागले
सभेच्या शेवटी सारे
गळाभेट घेऊ लागले (6)