STORYMIRROR

Archana Joshi

Inspirational

3  

Archana Joshi

Inspirational

जीवन - एक नदी

जीवन - एक नदी

1 min
646

जीवन काय आणी नदी काय 

वाट ठरलेली असते....

नदीला फक्त वाहायचं असतं 

दोन किनाऱ्यांमधून किंवा सोडून

सरळ किंवा वाकडं, कसं वाहायचं हे नदीला ठरवायचं असतं


उन्हाळ्यात सुकून सुद्धा 

पावसाळ्याची विश्वासाने वाट पहाणं,

भरभरून वहाताना आपलं गांभीर्य किंवा मर्यादा

न गमावता वाहणे नदीला ठरवायचं असतं


नदी काय किंवा जीवन काय लक्ष्य तर निश्चित असतं पण

 उंचीवरून कोसळताना किंवा कठीण मार्गातून

 वाहताना स्वतः खचून न हरवणं नदीच्या हातात असतं

आपल्यावर सतत होणाऱ्या अन्यायामुळे स्वतःला समृद्ध ठेवणे अशक्य असलं तरीही

 वाहता वाहता ताजेपण टिकवणे नदीच्या हाती असतं


आपलं अस्तित्व मिटवणाऱ्या भितीमध्ये पण सागराशी 

एक होण्याचा रोमांच कायम बाळगायचं असतं

वाट ठरलेली असली तरीही कसं वाहायचं 

 हे नदीलाच ठरवायचं असतं 


अखंड वाहणे एक सुंदर वाट निर्माण करत असते 

परत ढगातून उतरणाऱ्या नवीन प्रवाहासाठी ती वाट 

सुशील आणी सभ्य ठेवायचा निर्णय नदीच्या हातात असतो


प्रत्येक नदीचा मार्ग ठरलेला असतो 

नदीला फक्त वाहायचं असतं पण कसं

वाहायचं हे तिलाच ठरवायचं असतं 

तिलाच ठरवायचं असतं...


Rate this content
Log in

More marathi poem from Archana Joshi

Similar marathi poem from Inspirational