गणित जीवनाचे
गणित जीवनाचे

1 min

101
मित्र जोडावे ऋणानुबंधाचे
तसेच सुखांचे क्षण शोधा
दुःखाची झाली बेरीज
तरी गुणाकार सुखाचा साधा
चढ-उतार ऊन-सावली
ऐसे जीवन याचे नाव
आनंदी चेहरा ठेवावा
सुखी व्हावा प्रत्येक गाव
हातचे का राखावे सदा?
बंद मुठी त्या खोलाव्या
कधीतरी क्षणभर अशा
गुजगोष्टी त्या बोलाव्या!
गणित जीवनाचे
कठीण सोडवण्यास
हसत-खेळत सोडवता
येतो अर्थ जीवनास