आम्हाला नाही का घरदार
आम्हाला नाही का घरदार

1 min

146
सण असो वार असो
तुम्ही मात्र सदा पहाऱ्यावर
इतरांच्या जीवाची काळजी घेत
नामुष्की सहन करत
स्वतःसच पुसता..आम्हाला नाही का घरदार
संप असो मोर्चा असो
तुम्ही मात्र सदा पहाऱ्यावर
लाठी देत,दगड झेलत,स्वतःचा जीव धोक्यात घालत
स्वतःसच पुसता.. आम्हाला नाही का घरदार
भांडण असो,तंटा असो
तुम्ही मात्र सदा पहाऱ्यावर
तहान भूक विसरत,ऊन ,वारा,पाऊस मागे सारत
चोवीस तास ऑन ड्युटी करत
स्वतःसच पुसता..आम्हाला नाही का घरदार
कर्फ्यु असो, आजाराशी लढत असो
तुम्ही मात्र सदा पहाऱ्यावर
असुरक्षित छताखाली उभे राहत
सुरक्षाकवच बनत
कर्तव्यापुढे नात्यांची आसवे पापणीआड लपवत
स्वतःसच पुसता..आम्हाला नाही का घरदार