पाऊस... नामी
पाऊस... नामी
पाऊस नेत्रात दाटतो
पाऊस पत्रात भेटतो
पाऊस गात्रात साहतो
पाऊस पात्रात वाहतो.
पाऊस तिचीच आठवण
पाऊस काळीज साठवण
पाऊस हक्काचं आवतन
पाऊस घुसखोर सौतन.
पाऊस गावभर सांडतो
पाऊस शहरात कोंडतो
पाऊस कडाक्याचं भांडतो
पाऊस खूप काही मांडतो.
पाऊस हिरवाईचा बहर
पाऊस लाटा आणि लहर
पाऊस नव्हाळीचा मोहोर
पाऊस करतो कधी कहर...
पाऊस तू अन् पाऊस मी
पाऊस शब्द पाऊस हमी
पाऊस निमित्त आहे नामी
पाऊस ओलेती..खुमखुमी
