झाले आकाश ठेंगणे...
झाले आकाश ठेंगणे...
झाले आकाश ठेंगणे..
घडले मनासारखे सारे
आनंद मावेना गगनात,
चला वेचूया नभातले तारे..!
झाले आकाश ठेंगणे..
रोगमुक्त ठरली धरणी
शोधून लस रोगावरची,
केली आरोग्याची पेरणी...!
झाले आकाश ठेंगणे..
शाळेत येवू लागली पोरे
घंटानादाचा होता गजर,
उघडली शिक्षणाची दारे...!
झाले आकाश ठेंगणे..
चालले सुरळीत व्यवहार
बंद पडले एकदाचे,
रोगावरचे कटू समाचार...!
झाले आकाश ठेंगणे..
एकमेकांना भेटली माणसे
विसरून भय आजाराचे,
डोलू लागली मनात कणसे..!