स्पर्श
स्पर्श
स्पर्श झाला भावनांचा
शब्द नि:शब्द झाले
अश्रु दाटले डोळ्यात
नाही ओघळता आले
स्पर्श हलक्या मनाचा
जिथे नसेल ठाव तुझा
बोलतील शब्द काव्य
भास वाटे मज तुझा
स्पर्श लाभला प्रेमाचा
आठवणी जाग्या झाल्या
भेटण्याची ओढ झाली अन
क्षणात आठवणी रुसल्या
स्पर्श झाला सहवासाचा
प्रीत झाली आयुष्याची
असेच अखंड नाते राहो
साथ दे जीवनभराची
स्पर्श लाभला आयुष्याचा
मैत्रीची साथ दिली मोलाची
आयुष्यभराची जपली नाती
स्पर्शाने साथ खुलली मनाची

