STORYMIRROR

Dipali Kevat

Romance

3  

Dipali Kevat

Romance

प्रेम एक अव्यक्त भावना

प्रेम एक अव्यक्त भावना

1 min
370

व्यथा ही मनाची न समजे कुणी

भावना ही न कळे मनाची , 

दडलेल्या भावना त्या सदैव

करी विचार जनांचा


झाले काय मला कळेना? 

अनैतिक बदल आले उमलुनी, 

ओठांवरचे शब्द ओठांवर

तसेच राहे सुलगुणी


दोघांच्याही मनी भावना 

प्रेमाचीच हलचल करी, 

सहवास एकमेकांचा

स्पंदनाच्या वाढवे सरी


तो ही न सांगे, ती ही न सांगे

दडल्या त्या भावना मनात

राहिला अबोला त्याच्यांत

भावनाच नाही व्यक्त प्रेमात..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance