आयुष्याच्या सहवासात
आयुष्याच्या सहवासात
आई वडिलांच्या कर्तृत्वाची
मुलांनी नेहमी ठेवावी जाण,
लेकरांच्या सुखापोटी
करतात ते जीवाच रान
स्वत:च्या अपेक्षा मारी
सुख लेकरांचे पाही
यशाची शिखरे गाठावी
ओझे स्वप्नांचे बाप वाही
बापाला वाटत असे
पोर म्हातारपणाची काठी
ज्याच्या जोरावर सक्षम बनला
काढतो त्याच्यावरच लाठी
पोर त्याच साक्षर तर झाल
पुस्तकी ज्ञान त्यान कमावलं
वडिलांचे कष्ट विसरून
माणसातील माणूसपण गमावलं
नको विसरू त्यांचे उपकार
आयुष्य जग त्यांच्या सहवासात
आई वडील पुन्हा नाही
मिळत आयुष्याच्या प्रवाहात..!!
