STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

जोडी तुझी माझी

जोडी तुझी माझी

1 min
218

प्रीतफुला रे माझ्या सख्या प्रीतफुला

पहाटे पहाटे प्राजक्तासारखे उमलूया

दाही दिशा सुगंधीत मस्त करू या

इंद्रधनूच्या उंच झुल्यावर झुलू या....


मोगर्‍यापरी स्वच्छ शुभ्र निष्कलंक राहू या

अवघे आसमान सुवासिक करू या

पंख स्वप्नांचे लावून मग उंचच उंच

गगन भरारी घेवून विश्वात रमू या.....


सजणा साथ हवी तुझी मला

संगतीत तुझ्याच मी राहीन स्वच्छंदी

जीवनातील सर्व अनमोल क्षण 

घालवीन तुझ्याच सोबतीने आनंदी....,


माझ्या प्रीतफुला प्रीत जडली रे

मनापासून खास सजणा तुझ्यावर 

प्रितीचे मुल्य कळलं तुलाही आता

माया खूप करतोस तू माझ्यावर.....


जोडी तुझी माझी जीवनी जडली

रास प्रेमाची मनसोक्त ही बरसली

प्रीतपावसात आम्ही चिंब भिजतोय

दोघांची मने या पावसात रमली....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance