थोडं तुझं थोडं माझं
थोडं तुझं थोडं माझं
थोडं तुझं थोडं माझं
थोडं तुझं हसणं थोडं माझं रुसणं
जीवाला जीव देऊन आयुष्यात तुझं असणं..
थोडं तुझं थोडं माझं उष्ट खाणं होऊ दे
प्रेमाची गोडी अजून रंगात येऊ दे…
थोडं तुझं थोडं माझं करता करता आयुष्य सुखाने चालू दे
आपल्या ह्या सुंदर नात्याला सर्वांची साथ लाभू दे…
थोडं तुझं थोडं माझं नातं न विसरता
चेष्ठा मस्करी होऊ दे यातूनच नात्याचा गोडवा फुलू दे…
थोडं तुझं थोडं माझं पैश्याच्या बाबतीत नको होऊ दे
एकमेकांच्या आधाराने संसाराची वाट पुढे चालू दे …
थोडं तुझं थोडं माझं स्वप्न दोघे पाहू
आयुष्यच्या निवांत क्षणी चांदण्या राती पाहू …

