पाऊस पहिला
पाऊस पहिला
रिमझिम रिमझिम पाऊस आला
भरती नद्या नाले ओढा
धरणे जाती ओसंडून वाहून
हिरवळ झाली धरती अंबर ||१||
पक्षांच्या मृदू आवाजाने
किलबिल झाली चुहूकडे
मातीचा सुगंध दरवळलं सर्वत्र
आनंदाने थयथयी नाचे मोर||२||
झाडे आनंदाने डोलती
पावसाच्या त्या आगमनाने
पाऊस पडतो रिमझिम रिमझिम
पक्षी आनंदाने उडू लागले||३||
घरट्यात होती पक्ष्याची पिल्ले
निसर्गाचे सौदर्य पाहून
झाले ते अचंबित
मेघ गर्जना झाली दाट
पावसाच्या येण्याने खास||४||
वर्षाच्या त्या आगमनाने
धरतीने पांघरली हिरवी चादर
निसर्गाच्या ह्या सानिध्यात
मानव घेती निवास त्या छायेत||५||
नभ दाटून आले सर्वत्र
पाखराने झेप घेतली आकाशात
हवेहवेसे वाटणारे हे निसर्ग सौदर्य
सानिध्यात राहू आपण सर्वजण
पण घेऊन आपण त्याची काळजी
रोज करू वृक्षारोपण
तेव्हाच हे निसर्ग सौंदर्य टिकवून राहती निरंतर||६||
