STORYMIRROR

Sagar Bhalekar

Romance Inspirational

3  

Sagar Bhalekar

Romance Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
414

मैत्री 

अचानक न सांगता 

मिळालेली तुझ्या मैत्रीची साथ 

शेवटच्या श्वासापर्यंत 

सोडू नको मैत्रीचा हात….

आपल्या दोघांच्या मैत्रीचे 

नाते असेच बहरू दे

पावलो पावली तुझ्यावरचा 

माझा विश्वास अजून दृढ होउ दे….

मैत्रीचे हे ऋणानुबंध 

असती सदा वरचेवर 

हात तो देता मैत्रीचा 

होतील दोघे सुखकर….

मैत्रीच्या त्या सुंदर नात्याला 

फुलत असू दे वारंवार 

एकमेकांच्या आधाराने 

होतील क्षण आनंदमय….

मैत्रीच्या अश्या सुंदर नात्याला 

नजर कोणाची लागू नये 

अश्या ह्या दोघांच्या सुंदर मैत्रीला 

वय सुद्धा कमी पडू नये….

मैत्री न सांगता

होणारी असते

मात्र दोघांनी मैत्रीचे

सुंदर धागे जोडायला शिकले पाहिजे….. 

 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance