STORYMIRROR

Sagar Bhalekar

Others

3  

Sagar Bhalekar

Others

बाबा

बाबा

1 min
235

बाबा तू होतास म्हणून 

एक हात होता माझ्या डोक्यावर 

मात्र तू नसताना छत्र हरवून बसलो मी |

बाबा तू होतास म्हणून 

माझ्या पाठीवर होती शाबासकीची थाप 

मात्र तू नसताना तुझी सावली हरवून बसलो मी |

बाबा तू होतास म्हणून 

झाले माझे भरपूर लाड 

मात्र तू नसताना तू हवा म्हणून करतो मी अट्टहास |

का रे असा मला न सांगता तू गेलास 

सगळ्या इच्छा माझ्या राहिल्या अपुऱ्या 

तू होतास तेव्हा होत कोणीतरी विचारायला |

तू होतास म्हणून

हट्ट माझे व्हायचे पूर्ण 

मात्र तू नसताना माझे जग राहिले अपूर्ण |

नाही रे आता कोणीच लाड करत नाही माझे

सर्वाचा विचार करून तू मात्र मला एकटयाला सोडू गेलास |


Rate this content
Log in