मिसळ
मिसळ
1 min
317
मिसळ म्हणजे मिसळ असते
सगळ्यांच्या आवडीची उसळ असते
आज आहे संडे, भरपूर गर्दी आहे तिथे
तिखट चालत नसेल तर खाऊ नका इथे
मिसळ म्हणजे मिसळ असते
सगळ्यांच्या आवडीची उसळ असते…
भरपूर प्रमाणात पोहे, शेव आणि मटकीची उसळ
या तिघांचे एकत्रित मिश्रण करून बनते मसालेदार मिसळ
मिसळ सोबत असतो चिरलेला कांदा,कोथिंबीर, तिखट रस्याचा स्वाद
मिसळ खाण्यात करू नका मुंबईकरांचा नाद
तिखट लागता मिसळ होतो वांदा
३/४ टॅबलेवरून आवाज येतो काका द्याना थोडा कांदा
मिसळ खाल्याने भरून येते दिल
नेमका प्रश्न पडतो कोण भरणार आपले बिल
मिसळ म्हणजे मिसळ असते
सगळ्यांच्या आवडीची उसळ असते…
