STORYMIRROR

Sagar Bhalekar

Others

3  

Sagar Bhalekar

Others

लिहायचं होत बरंच काही

लिहायचं होत बरंच काही

1 min
331

लिहायचं होत बरंच काही 

लिहायचं होत बरंच काही 

विषयाला अनुसरुन काहीच 

सुचत तर मुळीच नाही 

अन 

लेखणीने साथ दिलीच नाही….

आठवलं ते लिहीत राहावं 

मनात साठवलेले ते आठवत राहावं 

साठवलेल्या भावनांना 

लेखणीने कागदांवर 

प्रेम करण्यास भाग पाडाव… 

लेखणीने अखेरीस भाग पाडले 

भावनांचे कंठ दाटुनी आले …

नभाने पंख दाटले आकाशात 

चहुबाजूने निसर्ग हिरवळ झाले …

मातीचा सुगंध दरवळला चोहीकडे 

पक्ष्यांनी आडोसे घेतले झाडाचे 

पाने फुले बहरली आनंदाने…

जेष्ठाच्या आगमनाने फुलविले 

निसर्ग सौदर्याने 

डोंगर दऱ्या नद्यांनी

घेतले आपले तारुण्य…

अश्या या निसर्गाच्या सानिध्यात 

राहावेसे खूप वाटते 

पण आताच्या कामकाजात 

वेळ पुरेसा मिळत नाही…

त्यात पडली कोरोना ह्या संकटाची भर 

बाहेर पडावयास मिळत नाही 

घरचेच कुंपण टोचती चोहीकडे 

बाहेर पडावयास कारण लागते

कोरोनाशी लढावयास लस घ्यावीच लागते… 

हीच काळाची गरज झाली 

कारण सर्वत्र मुर्त्यूतांडवच झाले 

सर्वानी नियम पाळले वारंवार 

तरी कोरोनाचे संकट येती पुन्हा पुन्हा

हे निसर्ग देवा घेऊनि जा त्यास लवकर…                            


Rate this content
Log in