STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Romance

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Romance

चांदण्या रात्री

चांदण्या रात्री

1 min
226

सखे चांदण्या रात्री तू

आली माझ्या संगतीला |

खुप महत्त्व भेटले

आज नव्या रंगतीला ||१||


उभी आहेत साक्षीला

वृक्ष ढगे आणि तारे |

मंद चंद्र प्रकाशात

वाहे झुळझुळ वारे ||२||


झुळझुळ वाहणारा

वारा करी आम्हा स्पर्श |

मिठी मारण्यात धुंद

मनी बाळगुनी हर्ष  ||३||


प्रतिबिंब चांदण्याचे

दिसे तळ्यामध्ये खास |

वाटे जणू खाली आले

प्रेम माझे पाहण्यास  ||४||


तुझ्या सागरी डोळ्यांच्या

डोहामध्ये मी बुडलो |

नकळत कधी तुझ्या

बाहुपाशी जखडलो ||५||


प्रेममय संगतीला

मला मिळे नवी साथ |

मग धरी जीवनात

कायमचा तुझा हात ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance