STORYMIRROR

Swanandi Sudha

Romance

3  

Swanandi Sudha

Romance

मीरा

मीरा

1 min
270

मिटल्या या डोळ्यांनी किती गावी भजने,

मंद हसऱ्या ओठांवर तुझीच की रे वचने...

कान्हा रे मीरा तुझी तुझ्यासाठी झुरते रे,

रात्रंदिन मंत्रमुग्ध गीतमणी ओवते रे...


वेडी मीरा तुला पाही जिथे जाई नजर रे,

तू जसा मृगजळ, आहेस तरीही नाहीस रे...

नको वेड्या मीरे छळू, तुझ्यासाठी हा खेळ रे,

मीरे मनी पूजा तुझी, तुला कोण खबर रे...


भोज राजा लाभले हे मीरा रूपी रत्न रे,

बांधे तो पूजा तिची, अहोरात्र स्मरण रे...

लाभे ना त्यास तरी तिच्या मनीचा ठाव रे...

रणभूमी करी जवळ, मिळे त्यास आस रे...


मीरे वाटे तुझे स्मरण हेच असे सत्य रे...

सत्य कोण, मिथ्या कोण, सारे तिला कृष्ण रे...

सांग तिला एकवार - तू केवळ "भास" रे...

भासापरी न जावे जीवन एक व्यर्थ रे...

कान्हा रे मीरा तुझी तुझ्यासाठी झुरते रे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance