STORYMIRROR

Swanandi Sudha

Others

4  

Swanandi Sudha

Others

कविता... श्रावणातली...

कविता... श्रावणातली...

1 min
516

खेळ चालला श्रावणमासी

ऊन पावसाचा... 

धरित्री सजली नेसून 

शालू हिरवा तारुण्याचा...


आठवणींचा श्रावण तसाच 

फुले मनी नित्याचा...

कधी ओठांवर हसू, 

कधी पाऊस आसवांचा... 


सवे तुझ्या उमटे मनावर  

इंद्रधनु स्वप्नांचा... 

स्वप्न कोणते? सत्य कोणते? 

न कळे हा खेळ भावनांचा... 


माझ्यात तू की तुझ्यात मी..?

सांग रंग हा कोणाचा..?

हात असू दे असाच हाती, 

संग हा जन्मांतरीचा...! 


कधी विरहाचे ऊन..,

कधी वर्षाव प्रेमाचा...

तुझ्याचसंगे सुंदर होई 

श्रावण हा आयुष्याचा...! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन