क्षितिजाची ओढ...
क्षितिजाची ओढ...

1 min

11.9K
चल उंच आकाशी भरारी घेऊ,
नवी क्षितिजे पाहून येऊ...
जे नाही मिळाले त्याचे दुःख कशाला?
आयुष्याला नवे अर्थ देऊ...
जन्मा आलो काही करून जायला,
नवी आव्हाने पेलून घेऊ...
चल उंच आकाशी भरारी घेऊ,
नवी क्षितिजे पाहून येऊ...
गर्दी झाली अवती भवती,
नुसता सारा कोलाहल...
दंग्यामध्ये हरवायचे कशाला?
हात हातात धरून ठेवू...
चल उंच आकाशी भरारी घेऊ,
नवी क्षितिजे पाहून येऊ ...
जीवन हे क्षणभंगूर असे,
आज आहे उद्या नाही...
मरतानाही खंत नको,
जगण्याला या सार्थ करू...
चल उंच आकाशी भरारी घेऊ,
नवी क्षितिजे पाहून येऊ …