STORYMIRROR

Swanandi Sudha

Romance

4  

Swanandi Sudha

Romance

माझ्या अंतरीचा कान्हा

माझ्या अंतरीचा कान्हा

1 min
429

त्या निरव सायंकाळी

घन भरून आले अंबरी,

तव आठवांच्या ओळी

दाटून आल्या जीवा अंतरी...


मी तुझ्यात होई बंदी

कळे सुटका नसे मज खरी,

मी मिटून लोचने घेई,

तुझी जाणीव आर्त अंतरी...


दिसे सावळा कान्हा ठायी

त्या शांत नदीच्या किनारी,

खळखळत्या प्रवाहावरती

विहरते मग्न मुग्ध बासरी...


कधी दिसे मज तो कान्हा,

कधी भास तुझा रे होई...

मी राधा बनुनी गेले,

तुझ्या संगती रे, मुरारी ...


पांघरला शेला रेशमी

मी तुझ्या न माझ्या भोवती...

तो कान्हा मज पाहतो

हासुनी राधेस आपुल्या आठवी...


विसावले तुझ्या छातीशी,

बाहुपाश तुझे मज वेढी...

धडधड हृदयीची सांगे

स्वप्न प्रितीचे सख्या गुलाबी...


मौनातच रचले असंख्य

अभंग तुझ्या भक्तीचे...

तूच कान्हा असशी माझा,

वसशी निरंतर अंतरी...


वाऱ्याने सावध केले,

स्वप्नातून आणिले परती...

स्वप्नीचे सुंदर क्षण ते

सदा राहिले तरी अंतरी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance