वाट एकटीची...
वाट एकटीची...
1 min
360
मी एकटी चालत रहाते
वाटेवरती निरंतर ...
वाट ही संपेना
वाट पहाणेही संपेना...
कोणाची वाट पहाते मी
हे ही मला उमजेना ...
वाटेवरचे काचा काटे
मला आता रुतेना,
जखम जिव्हारी झालेली
काही करता भरेना ...
तू तुझ्या जगामध्ये
मग्न अन् दंगलेला,
आयुष्याच्या रंगांमध्ये
इंद्रधनुपरी रंगलेला ...
तुला मिळावे सारे काही
सुंदर अन् सजलेले,
हेच मागणे मी सदैव
मनापासून मागितलेले ...
वाट ही आहे जरी
केवळ मज एकटीची,
सोबत आहे तरी
गर्दी साऱ्या दुनियेची ...
चिंता माझी कुणी इथे
न करावी निरर्थक ..
मी एकटी चालत रहाते
वाटेवरती निरंतर ...
