STORYMIRROR

Swanandi Sudha

Romance

4  

Swanandi Sudha

Romance

सांजवेळ

सांजवेळ

1 min
355

सांजवेळ झाली सख्या

पसरली नभी केसरलाली,

पाखरांची ओळ बघ

घरटी परताया निघाली...


तूही ये परतुनी

घरी सांजवात लागली...

वाट तरी परतीची

अंधारी बुडू लागली...


वाट पाहुनी सख्या

जरी नजर क्षीण जाहली,

हृदयात प्रेम पालवी

मी जपून आहे राखली...


चाहूल लागे तुझी,

माया वेडी मनी दाटली...

मीच असे सखी तुझी..,

कधी बनते माय माऊली...!


येता परतुनी तू

घरी ऊब बघ पसरली...,

घास तुला भरविता

नजरेत प्रीत ओसंडली...


चहू दिशा अंधारल्या,

निशा आसमंती पसरली...

शाल तुझ्या श्वासांची

मग्न मुग्ध मी पांघरली... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance