प्रीतीच्या वाटेवर
प्रीतीच्या वाटेवर
शब्दातली जादू तुझ्या
तार मनातले छेडते ।
शोधतो तयात मी
का प्रित अशीच जडते ।
भावनांचा मेळ हाच
मन मनास जोडते ।
प्रीतीच्या या वाटेवरती
काय असे ते घडते ।
दुःखातही आपोआप
अश्रू नयनातून ढळते ।

