STORYMIRROR

Anju Metkar

Romance

3  

Anju Metkar

Romance

मी प्रेमदिवाणा

मी प्रेमदिवाणा

1 min
264

प्रेमाच्या मखमली हिरवळीवर

अचानक आयुष्याच्या वळणावर

अवचित ती भेटली वाटेवर

अन् गोडशी हसली मनभर ।।१।।

मी ही खुश झालो जीवनावर

नियतीच्या त्या देखण्या खेळीवर

खुपश्या दडवलेल्या घटना तर

आपचूक आल्या मग ओठांवर ।।२।।

स्मृतींची पाने चाळत सरसर

क्षणार्धात मी पोहोचलो तारूण्याच्या उंबरठ्यावर

मन खट्टू झाले सैरभैर

तिच्या मोहक अदांवर अन् सुरेख छबीवर ।।३।।

वाटे फिरून व्हावे लहानसर

घेऊन तिचा करी कर

तिला फिरवावे स्वप्नातील वाटेवर

अन् कथावे मनीचे गुपित गुलाबीसर ।।४।।

लपवले जरी होते जे आजवर

जणू ह्रदयकुपीतील सुवासिक अत्तर

उफाळून परिमळ दरवळे दूरवर

मनी खंत डाचे पळभर ।।५।।

मी पुनश्च भाळलो तिच्यावर

सरता काळ सरेना तीळभर

तिच्या आठवांचा पूर नेत्रांवर

नयन झरू लागले निरंतर ।।६।।

प्रेमाच्या गावीचा हा वावर

मनास सुखावे चिरंतर

परि कल्पक मनीचा जागर

थोपवून म्हणतो सावर सावर ।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance