STORYMIRROR

Vishakha Gavhande

Romance Inspirational

3  

Vishakha Gavhande

Romance Inspirational

प्रेम रंग

प्रेम रंग

1 min
234

सुंदर आहे म्हणून I love you हे शब्द बोलले 

कि प्रेम होते काय 

त्याला बाकी काही नको का 

प्रेम तर I  hate you ने ही होत

भावना आहेत तुझ्या जवळ 

प्रेम खरे असावे 

कोणी पाहिले म्हणून लपायला आडोसा नसावा कधीच 

मला प्रेम हवे मनापासून मन हवं 

चार दिवसांचे लफडे नसावे 

प्रेम करणे म्हणजे उठसूठ मागे लागून कसे चालेल कोणाच्या ही उगीच ज्याची त्याची मर्जी 

आपले मन द्यायचं की नाही 

प्रेमाचं_घोंगडे कितीही भिजवत ठेवले 

तरी त्यात भावनेचा ओलावा नसेल 

तर ते काय कामाचे जरधरी घोंगडे काही कामाचे नाही 

फक्त देखावा असतो बाकी काही नसते 

आणखी काही बाकी राहिले आहे काय 

मनात #अधुरी_कहाणी कधीच नसावी 

प्रेम करायचं तर सर्व खुले मन घेऊन 

प्रेमाची चोरी नाही करायची 

 नाहीतर लागेल प्रेमाला डाग 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance