नवदुर्गा
नवदुर्गा
कोल्हापूर वसति अंबाबाई
जगत् आदि तू भक्तांची महालक्ष्मी आई।।१।।
माहूरला वसति रेणुका माता
सगुण निर्गुण रूप तुझे कल्याणकारी अशी देवता।।२।।
तुळजापूरची तुळजाभवानी
कुलस्वामिनी तू माझी पूजिते पंचारती ओवाळूनी।।३।।
अर्धे शक्तिपीठसप्तशृंगी देवी
सर्व व्यापक तू भक्ता सुखात ठेवी।।४।।
अशीही साडेतीन शक्तीपीठे साऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान
महालक्ष्मीचे प्रसन्न चित्ताने भक्तगण करते गुणगान।।५।।
