STORYMIRROR

Vishakha Gavhande

Inspirational

3  

Vishakha Gavhande

Inspirational

आता तरी जागे व्हा!

आता तरी जागे व्हा!

1 min
143

मुलगी जळती रडती आम्ही बघतोय! 

तिच्या किंकाळीतून 

निघणाऱ्यां अश्रुधारा मोबाइल मध्ये भरतोय! 

लाज नाही शरम नाही काय तर आम्ही डिजिटल होतोय! 

नराधम पळत सुततोय आम्ही त्याला जीवंत सोडतोय! 

भरचौकात मुलगी जळत असता आम्ही तिला खुल्या डोळ्यांनी बागतोय! 

निषेध मोर्चे अन what's App स्टेटस यातच आम्ही रमतोय! 

नराधम तिला जाळत असताना आम्ही ते दृष्य  कॅमेरा मध्ये कैद करतोय! 

मुलगीही मरनाशी लढत असतानाही आम्ही तीची 

जात धर्म शोधतोय! 

अजून किती निर्भया मरनाशी लढणार आहे याच चिंतन करून शासनाला दोष देतोय! 

नराधमांचे जणू आम्ही साथी बाजु त्यांची मांडतोय! 

मन विषन्न करणाऱ्या घटना घडतात आम्ही मैसेज फॉरवड फॉरवड खेळतोय! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational