बैल पोळा
बैल पोळा
डौलदार बैलांची जोडी
गळ्यात घुंगराची लडी
रोज शेतावर राबून
येती दमून भागून
हात फिरविता पाठीवरून
लाडीगोडी पाय चाटून
बैल पोळ्याच्या दिवशी
गडी सतत त्यांच्या पाठीशी
विचारू नका केवढा थाट
वस्त्राला सुंदर जरीकाठ
