उडू लागले मन माझे बनुनी पाखरू
उडू लागले मन माझे बनुनी पाखरू
पहिले जेव्हा तुला मी पाहताना तु मला
मी तुझा होऊनी गेलो
विसर पडली माझी मला
काय जादू झाली सांगना
हरवुनी जातो पुन्हा-पुन्हा का तुझ्यामधी सांगना
उडू लागले मन माझे बनुनी पाखरू
नव्याने पुन्हा भेटलीस तू
सांग ना जरा कसा मला मी सावरू.
बघता तुला वाटे नेहमी मला
तुझी साथ हवीशी हवीशी .
उडू लागले मन माझे बनुनी पाखरू
गुंतलेल्या क्षणी सावरू वाटते
सोडवुनी पुन्हा मन कसे गुंतते
रानात पसरले जसे मोर पंख सर्वीकडे
होऊ लागले वेडेपिसे मन सारे
उडू लागले मन माझे बनुनी पाखरू

