STORYMIRROR

Rajesh Varhade

Romance

3  

Rajesh Varhade

Romance

रिमझिम पाऊस

रिमझिम पाऊस

1 min
264

रिमझिम आला पाऊस सरीवर सरी सरीवर सरी 

आनंद झाला सर्वांना कोणी घरी कोणी दारी


शोधाशोध झाली छत्री रेनकोटची 

पाऊस पहिला हौस भारी पाण्यात भिजायची


अंगाला झोंबता वारा शहारा आणतो 

भूक वाढत मग गरम चहा भजी आठवतो


मेघराजाचे मानावे आभार बरसला 

आधार धरणीमाता आणि माझ्या पोशिंद्याला


साकडे घाला देवाला ओला दुष्काळ पुरेल 

पण कोरडा नकोच नको जीव वेशीला टांगेल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance