STORYMIRROR

Suraj Rathi

Romance

3  

Suraj Rathi

Romance

आवडतेस तू मला फार

आवडतेस तू मला फार

1 min
1.8K

आवडतेस तू मला फार

जेव्हा तू पहिल्यांदा नजरेस पडलीस

सांगू कसं तुला तेव्हा पासनंच आवडतेस तू मला फार


सुंदर गोजिरवाण दिसणार रूप तुझे ,

मनात माझ्या घर करून गेले 

हसताना तुझ्या गालावरती खिलणारी कळी ,

बघून भानच माझे हरवून गेले 

सांगू कसं तुला आवडतेस तू मला फार


कळले नाही मला तुला कधी 

कवितेच्या वहीत कविता म्हणून,

तुझं चित्र रेखाटू लागलो

लिहिताना शब्ध कसे अपुरे,

पडू लागले कळलेच नाही

सांगू कसं तुला आवडतेस तू मला फार


आवडतात तुला माझ्या कविता फार

लाजत लाजत कविता वाचत बघताना

आवडते तू मला फार

सांगू कसं तुला आवडतेस तू मला फार


असते सोबत जेव्हा तू

आयुष्यात सगळं काही,

भेटल्या सारखं वाटत

नसतेस जेव्हा सोबत तू,

काही तरी हरवल्यासारखं वाटत

सांगू कसं तुला आवडतेस तू मला फार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance