ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
102
वाऱ्यासोबत डुलणाऱ्या झुडुपाची
सरीच्या पाऊसात चिंब भिजण्याची
ओढ पावसाची वेळ हिरवे रान सजण्याची
आतुरता फुलांना सर्वत्र सुगंध दरवळत
मनसोक्त मयूरा सोबत नाचण्याची
ओढ पावसाची वेळ काली माती अन
पावसाच्या पाण्याच्या मधूर मिलनाची
हसत खेळत सर्वांना आनंदीत करण्याची
ओढ पावसाची शेतकऱ्याच्या
जीवनाला हातभार लावण्याची
ओढ पावसाची कवीच्या मनातील
भावना कवितेत उतरविण्याची