बघितलं तुला आज तर
बघितलं तुला आज तर
बघितलं तुला आज तर
मन माझं भिन्न भिन्न लग
काळजात रूप तुझं
घरटं करून बसलयग
माहिती नाही तुझ्या
नजरेनी काय जादू केलीग
हृदयात माझ्या प्रेमाची कळी फुललीग
नाव तुझं माझ्या ओठांवरती गुणू-गुणू लागलोयग
बघितलं तुला आज तर ,
मन माझं भिन्न भिन्न लग
चंदनाचा गंध हा भासतोयग
गुलाबाची कळी तुला बघून लाजतेयग
हसताना चंद्र छान दिस्तोयग
पैंजणाचा नाद तुझा सर्वत्र घुमतोयग
बघितलं तुला आज तर
मन माझं भिन्न भिन्न लग
मुखडा तुझा दिसतोय किती गोराग
नजरेत भरलंय जस तुझं काजळग
स्पर्शानी शहारलं मन हे माझं
केसात तुझ्या बहरलं फुल जसं
माझ्या मनामध्ये तुझं मन घुरफटलंग
बघितलं तुला आज तर
मन माझं भिन्न भिन्न लग

