डोळ्यातली जादू
डोळ्यातली जादू
मला समजून घेणारी तुझ्या डोळ्यातली जादू
मनाला ओढते आहे तुझ्या प्रेमातली जादू
कितीदा सांग वाचू मी तुझ्या प्रेमातल्या रचना
मनाला भावली आहे तुझ्या काव्यातली जादू
कुणाला काय सांगावे मला काहीच समजेना
मना घाले भुरळ मजला तुझ्या नयनातली जादू
मला जिंकून घेणारी तुझ्या बागेतली पुष्पे
सुवासाने मनी भरली तुझ्या पुष्पातली जादू
तुला पाहून आनंदी मनाचा मोर हा नाचे
मला भेटून जाणावे तुझ्या हसण्यातली जादू

