तुझ्या सोबत जगायचय
तुझ्या सोबत जगायचय
तुझ्या निळ्याशार डोळ्यात मला डुंबायचय
तुझ्या खांद्यावर डोक ठेवून मनसोक्त बोलायचय
कारण मला तुझ्या सोबत जगायचय
पावलांच्या ठशांनी आयुष्याची रांगोळी काढायची
आणि त्या रांगोळी साठी ह्रदयात महाल बांढयचाय
कारण मला तुझ्या सोबत जगायचय
तुझ्या गोड वाणीतून पडलेला हरएक शब्द मला माझ्या शब्दकोशात लिहून ठेवायचाय
आणि त्या शब्दांनी माझ्या आयुष्याची कथा लिहायचिय
कारण मला तुझ्या सोबत जगायचय
तुझ्या हातची चटणी भाकर खाऊन सुखाची ढेकर द्यायचीय
दुःखाच्या ठसक्यासाठी तुझ्या प्रेमाची फुंकर माझ्या कानात पहिजेय
कारण मला तुझ्या सोबत जगायचय
अश्रूंच्या पुराने दुःखाचा गाळ वाहुन जावु देत
त्या सुपिक झालेल्या मनाच्या वावरात साता जन्माच सुख उगवायचय
कारण मला तुझ्या सोबत जगायचय

